Skip to main content

Posts

ह्या घरगुती उपायांनी ताप पळवा

   ताप आल्यावर प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील करावेत. काय आहेत हे घरगुती उपाय… तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो. – आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जाईल. – तापात बेलफळाचं चूर्ण उपयुक्त ठरतं. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून ताप उतरेपर्यंत घ्यावं. – सफरचंद, दूध, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा. – कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण ५-१० मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो. – तापकमी करण्यासाठी तुळशीचा रसदेखील फायदेशीर ठरतो. लहान मुलांसाठीदेखील हा उपाय सुरक्षित आणि फायदेशीर आहे. १०-१५ तुळशीच्या पानांना पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटावे. २-३ तासांनी तुळशीचा रस प्यावा. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.  

जाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे

turmeric benifits पाणी म्हणजेच जीवन, हे तुम्ही ऐकलेच असेल. चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणे आवश्‍यक असतेच. परंतु, तुम्ही रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू, थोडी हळद आणि मध मिसळून घ्या. याचे अनेक आश्‍चर्यकारक फायदे होतील. ते पुढीलप्रमाणे… . हळदीचे पाणी पिण्यामुळे जेवण सहज पचनण्यास मदत होते. यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात. अनेक कारणांने शरीरावर सूज येते. परंतु, तुम्ही जर हळदीचे पाणी पिला तर ही सूज कमी होते. या पाण्यात करक्‍युमिन नवाचे एक रसाययन असते. यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. हळदीचे पाणी पिल्याने रक्त जमा होत नाही. यासोबतच धमन्यांमध्ये रक्त साचत नाही. हे पाणी सांधे दुखी आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे या रोगावर एका औषधीप्रमाणेच काम करते. हळदीचे पाणी पिल्यास साखरेवर नियंत्रण ठेवले जाऊन मधुमेहाची शक्‍यता कमी होते. हळदीमध्ये करक्‍युमिन असल्याने हे एक अँटीऑक्‍सींडेंट आहे. यामुळे कर्करोगाशी लढा देण्यास मदत करते.

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी पिस्ता खा

blood pressure home remedies उच्च रक्तदाब, किंवा हायपरटेंशन एक सामान्य आजार आहे. खासकरून 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला या रोगापासून पीडित राहतात. आजकल युवा देखील या आजारांपासून ग्रसित आहे. उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण तणाव, खराब भोजन, लठ्ठपणा, व्यायामाची कमतरता, उच्च कोलेस्ट्रॉल, असामान्य चयापचय इत्यादी आहे. जर उच्च रक्तदाबाचा उपचार नाही केला तर हा डोकेदुखी, थकवा आणि हृदय रोगांचे कारण बनू शकतो. जर तुम्ही उच्च रक्तदाबासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. आम्ही तुम्हाला असा रामबाण नुस्खा सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही ब्लड प्रेशन कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळू शकते. आवश्यक साहित्य - ड्राय पिस्ता 3 ते 4 - पाणी 1 ग्लास पिस्त्यात अंटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि कॉपर सारखे इतर आवश्यक पोषक तत्व असतात. तयार करण्याची विधी एका ग्लास पाण्यात पिस्ता घालून रात्रभर भिजवून ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट नंतर या पाण्याचे सेवन नरून पिस्ता खाऊन घ्या. उचित परिणाम मिळण्यासाठी ही क्रिया किमान 3 महिन्यापर्यंत ...

बालों को झड़ने से रोकने व बालो को तेजी से बढ़ाने के 2 उपाय

बालों को झड़ने से रोके, दोबारा से बालों को उगाए - आयुर्वेदिक उपचार

गूळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

१. घसा बसल्यास गूळ आणि शिजवलेला भात एकत्र खाल्ल्यास फायदा होतो. २. थकव्याचा त्रास जाणवल्यास गूळ आणि पाणी घ्यावे. आराम पडतो. ३. रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते. ४. कान दुखत असल्यास गूळ आणि तूप एकत्र मिसळून घेतल्यास आराम मिळतो. ५. जेवणानंतर गूळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते. तसेच गॅसची समस्याही दूर होते.

स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने

चेहऱ्यावर काळे डाग ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे. पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे. निस्तेज चेहरा चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहऱ्यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते. पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते. गव्हाचा कोंडा गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहऱ्यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो. तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घेणे. एक चमचा मध...