Skip to main content

Posts

स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने

चेहऱ्यावर काळे डाग ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे. पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे. निस्तेज चेहरा चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहऱ्यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते. पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते. गव्हाचा कोंडा गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहऱ्यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो. तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घेणे. एक चमचा मध...

विविध व्याधींवर पिंपळी

पोटाचे विकार - पिंपळी चूर्ण गुणकारी पिंपळीचे औषधात अनेक उपयोग आहेत. पण विशेषत: दमा, खोकला व सर्व प्रकारचे वातविकार व कफरोग यांवर अत्यंत गुणकारी आहे. कफयुक्त खोकल्यावर पिंपळीचे चूर्ण तूप व मध द्यावे. मात्र ते सर्व विषम प्रमाणात द्यावे म्हणजे आराम वाटतो. जेवण झाल्यावर पोट जड वाटणे अथवा पोटास तडस लागत असेल व अन्नपचन होत नसेल, तर जेवणानंतर पिंपळीचे चूर्ण मधाशी खावे. तसेच पोटात वात धरुन शूल होत असेल, तर पिंपळीचे चूर्ण सैंधव, आल्याचा रस व थोडा मध यातून दिल्याने दुखने थांबते. भुक अजिबात लागत नसेल व बारीक ताप असेल तसेच तोंड बेचव असून मळमळ , तोंडाला पाणी सुटणे इत्यादी लक्षणे होत असतील तर नुसते पिंप्ळीचे चूर्ण गुळाबरोबर घेतल्याने हे विकार कमी होतात. पिंपळीचे चूर्ण नुसते न घेता त्याबरोबर सुंठीचे चूर्णही थोडेसे घेतल्यास लवकर गुण येण्यास मदत होते. दमा, खोकला, ह्र्दयाचे विकार, कावीळ, पांडुरोग इत्यादी रोगही या उपायाने बरे होतात. पिंपाळीचे चूर्णाचे दुप्पट गुळ घ्यावा असे वैदक शास्त्रात सांगितले आहे. मध व पिंपळीने चरबी कमी होते दात दुखणे, हालणे, ठणका लागणे इत्यादीसाठी पिंपळी, जिरे, व...

मधाचे औषधी उपयोग

दृष्टीदोष डोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणी गळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी डोळ्यात नुसता मध घालवा अगर सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा. यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे होतात. दृष्टी फार लवकर सुधारते. त्वचारोग सारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा उत्पन्न होतो. त्वचेची आग होते. अशा वेळी मध रोज घेणे हितकारक आहे. रोज वयोमानाप्रमाणे १ ते २ तोळे मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. अंगकाठी सतेज होते. श्वास खोकला श्वासामुळे सारखा लागणारा दम, कफामुळे सारखा येणारा खोकला, खोकुन खोकुन पोटात दुखु लागते. कंबर वाकते. एक प्रकारची तोंडावर सूज येते. सारखा कफ पडतो. अशावेळी मध अगर त्रिफळा पूर्ण व मध एकत्र करुन घावे. अतिसार काही खाल्ले तरी वांती होणे. अशी सवय अनेकांना असते. म्हणून अन्न पचत नाही. त्यामुळे भुक चांगली नसते. वांति होईल या भितीने अन्नद्वेष. त्यामुळे निरूत्साह उत्पन्न होती. यावेळी मधाचा वापर अन्नात अवश्य करावा. त्यामुळे वांती होण्याची प्रवृत्ती कमी होते. कृमी लहान बालके, मोठी माणसे को...

औषधी डाळींब

 डाळींबात अनेक औषधी गुण आहेत. डाळींबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार बरा होतो.काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.

धूम्रपान सोडवण्यासाठी हे पदार्थ दररोज खा

लोक धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र, घरातीलच काही उपयांनी तुम्ही धूम्रपानाची सवय सोडू शकतात.  * ओट्सच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठून ओट्सचे सेवन करा.  * मधामधे व्हिटॅमिन्स, एंझाईम्स आणि प्रोटीन्स असतात. धूम्रपानाची सवय सोडणार्‍यांनी दररोज मधाचे सेवन करावे. * मुळ्याचे सेवन मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणार्‍यांसाठी फायद्याचे आहे. मुळ्याचे सेवन मधासोबत केल्याचा अधिक फायदा होतो. * ज्येष्ठमधाचे नियमित सेवन केल्याने धूम्रपानाची सवय कमी होते.

वजन कमी करण्यासाठी 10 उकळलेल्या भाज्या

आपण असे ऐकले असेल की भाज्यांना जास्त शिजवल्याने किंवा उकळल्याने त्यातील पौष्टिक तत्त्व नष्ट होतात परंतू काही फळ, भाज्या अश्याही आहे ज्या उकळवून खाल्ल्याने फायदा होतो. जाणून घ्या कोणत्या आहे या भाज्या: कोबी - कोबी उकळवून खाल्ल्याने स्वाद तर वाढेलच याबरोबरच पौष्टिकातही वाढेल. आपल्या वजन कमी करायचे असल्यास कोबी उकळवून खाल्ल्याने किंवा याच सूप पिण्यानेही फायदा मिळतो. पालक - पालक कच्चा खाण्यापेक्षा उकळून किंवा भाजी बनवून खाण्याने दुप्पट पोषण मिळतं. तज्ज्ञांप्रमाणे हिरव्या पालेभाज्या उकळून खाल्ल्याने दुप्पट ताकद मिळते. विशेषतः मेथी आणि पालक.

'तो' त्रास पुन्हा नको...

 हृदयविकाराचा झटका आल्यानंतर धूम्रपान सोडायला हवं. सध्या काही महिलाही धुम्रपान करतात. हे लक्षात घेता हा सल्ला महत्त्वाचा ठरतो.  * ट्रान्स फॅट आणि स्निग्ध पदार्थ वर्ज्य करा. तूप, तेलाचा आहारात नाममात्र वापर करा. चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनाने कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि हृदयाला नीट रक्तपुरवठा होत नाही.  * शर्करायुक्त पदार्थ, पेस्ट्री, केक असे पदार्थ कटाक्षाने टाळा. या पदार्थांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात.  * जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार दिवसाला 1500 मिलीग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणार्‍यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बरीच जास्त असते. त्यामुळे आहारात मीठाचं प्रमाण कमी ठेवा.  * चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ टाळा.  * हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पलंगावर पडून राहू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हालचाल करा. हलका व्यायामही करता येईल.  * हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपल्या आरोग्याकडे संपूर्ण लक्ष द...